Marathi Shorthand

मित्रांनो,
           महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व पदांसाठी होणाऱ्या परिक्षांमध्ये लघुलेखक या पदाचाही समावेश आहे, परंतू या क्षेत्राचा प्रसार खुपच अल्प झालेला आहे. आम्ही लघुलेखनाच्या प्रचार आणि प्रसारासाठी विशेष प्रयत्न करणार आहोत. 
             लघुलेखन म्हणजे वक्त्याच्या तोंडून कितीही दृतगतीने शब्द बाहेर पडले तरी ते लिहून घेणे होय, लघुलेखन तंत्राचा अविष्कार इंग्रजी भाषेमध्ये सर आयझॅक पीटमन यांनी सन 1937 मध्ये केला. सन 1840 मध्ये काही सुधारणांसह त्यांनी आपल्या लघुलेखनाची दुसरी आवृत्ती फोनोग्राफी किंवा आवाजाद्वारे लिखान या मथळयाखाली प्रसिध्द केली.
            लघुलेखन म्हणजे ऐकलेल्या आवाजाची (फोनॅटीक) संकेताकृती काढणे होय.  
लघुलेखन क्षेत्रात लघुलेखनाच्या विविध पध्दती जगभर प्रचलीत आले. गतीमान लेखन या एकाच तत्वावर या पध्दती विकसित झालेल्या आहेत. भारतात सर्व प्रथम प्रचलनात आलेली लघुलिपी म्हणजे सर आयझॅक पिट्मन यांनी विकसीत केलेली लघुलिपी. तिला पीट्समन लिपी म्हणूनही ओळखले जाते. मराठीमध्येही एकापेक्षा अधिक लघुलेखन लिपीचे अभ्यासक्रम उपलब्ध असून श्री.लिमये व श्री.इनामदार आणि कर्णिक या दोन लिपींचा अधिक विकास झालेला आहे. पैकी श्री.इनामदार आणि कर्णिक यांनी विकासीत केलेल्या मराठी लघूलिपीचा भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे प्रचार आणि प्रसार केला गेला असल्याने तिचा विकास अधिक झाला आहे. शासकीय प्रशिक्षण वर्गात याच लिपीचा वापर होत असल्याने इतर मराठी लघुलेखन वर्गही याच लिपीस प्राधान्य देतात. व श्री.इनामदार आणि कर्णिक यांनी मराठी लघुलेखन अभ्यासक्रम विकसीत करतांना इंग्रजी तील विकसीत लिप्यांचा अभ्यास करुन त्यांना अनुरूप अशी मराठी लिपी विकसित केलेली असल्याने दोन्ही भाषेतील लिपीवर प्रभूत्व मिळणे ही अधिक सोपे जाते.
eShorthand learning program च्या माध्यमातून आपल्याला श्री.इनामदार आणि कर्णिक यांनी विकसीत केलेल्या लघूलेखनच्या बेसिक ज्ञानापासून ते लिपीमध्ये अधिकाधीक वेगात व अचुक लघुलेखक कसे करता येईल, याविषयी  आवश्यक टिप्स देण्यात येईल.
Stenography Marathi
आमच्या यु-टयूब चॅनलच्या माध्यमातून लघूलेखनविषयक अध्ययन करण्यासाठी येथे क्लीक करा. 
लघुलेखन विषयक सामग्री डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लीक करा.

1 comment: