स्टॉक स्प्लिट (Split) म्हणजे काय ?
स्टॉक स्प्लिट - Stock Split म्हणजेच शेअरचे होणारे विभाजन.शेअर विभाजित करण्यामागे मुख्य कारण म्हणजे बाजारात शेअरची संख्या वाढवणे ,जेणेकरून शेअरची Liquidity वाढेल.
शेअरचे विभाजन केल्याने एकूण भांडवलात काही फरक पडत नाही परंतु शेअरची किंमत मात्र कमी होते.
उदा.
समजा XYZ कंपनीचा एक शेअर आपल्याकडे आहे आणि हा शेअर 100 रु प्रति शेअर दराने उपलब्ध आहे, व कंपनीने 2:1 या प्रमाणात शेअर स्प्लिट केला तर 1 शेअरचे 2 शेअर होतील आणि शेअरची किंमत 100 रु वरून 50 रुपये प्रति शेअर होईल.जरी शेअरची संख्या 1 वरून 2 झाली तरी शेअरची किंमत कमी झाल्याने आपली एकूण गुंतवणूक सारखीच राहते.
गुंतवणूक - शेअर स्प्लिट आधी =1*100= 100 रुपये
गुंतवणूक -शेअर स्प्लिट यानंतर=2*50 =100 रुपये
स्टॉक स्प्लिट का करतात?
शक्यतो ज्या वेळेस कंपनीच्या शेअरची किंमत ही खूपच वाढते आणि बाजारात वाढलेल्या किमतीमुळे गुंतवणूकदार त्या शेअर ची खरेदी करत नाही. अशावेळी शेअर बाजारातील त्या शेअरची खरेदी वाढावी यासाठी कंपन्या शेअर स्प्लिट करतात. शेअर स्प्लिट केल्याने शेअर किंमत कमी झाल्याने लहान गुंतवणूकदार सुध्दा त्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यास तयार होतात.
स्टॉक स्प्लिट प्रमाण
शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात शेअर स्प्लिट केला जातो. शेअर स्प्लिट केल्याने शेअरची face value सुद्धा त्या प्रमाणात कमी होते.
शेअर स्प्लिट हे 2:1,3:1,5:1 या प्रमाणात केले जाते.जर शेअर 2:1 या प्रमाणात स्प्लिट केला तर शेअर किंमत ही अर्धी होईल नि शेअरची संख्या दुप्पट होईल.
तसेच जर शेअर 5:1 या प्रमाणात स्प्लिट केला आणि शेअर किंमत की 100 रु असेल व face value 10 रु असेल, तर शेअरची किंमत ही 20 रु होईल आणि face value 10 रु वरून 2 रुपये होईल.
स्टॉक स्प्लिट उदाहरण👇
समजा ABC कंपनीचे 100 शेअर आपल्याकडे आहे आणि हा शेअर 90 रु प्रति शेअर दराने उपलब्ध आहे, व कंपनीने 3:1 या प्रमाणात शेअर स्प्लिट केला तर 100 शेअरचे 300 शेअर होतील आणि शेअरची किंमत 90 रु वरून 30 रुपये प्रति शेअर होईल.जरी शेअरची संख्या 100 वरून 300 झाली तरी शेअरची किंमत कमी झाल्याने आपली एकूण गुंतवणूक सारखीच राहते.
त्याचप्रमाणे इन्फोसिस ह्या कंपनीचे स्टॉक स्प्लिट हे उत्तम शेअर बाजारातील उदा. आहे.1993 मध्ये लिस्ट झालेल्या इन्फोसिस कंपनीने 1999 आणि 2018 या दोन वर्षी आपला शेअर स्प्लिट केला आहे.2018 साली 2:1 या प्रमाणात शेअर स्प्लिट केला.
हिरो मोटोरकॉर्प, बाटा इंडिया, HDFC बँक,बालाजी टेलिफिल्म, DR रेड्डीस लॅब,TVs मोटर्स आशा अनेक कंपन्यांनी आपला शेअर बाजारामध्ये स्प्लिट केलेला आहे.
स्टॉक स्प्लिट व स्टॉक बोनस यामध्ये काय फरक आहे?
वर चर्चा केल्याप्रमाणे, स्टॉक विभाजनामुळे आपल्या विद्यमान शेअर्सचा संख्येमध्ये वाढ होते . जरी शेअरचे मूल्य बदलत असले तरी पण , आपल्या पोर्टफोलिओ मधील एकूण शेअर्सच्या गुंतवणूक भांडवलावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
तथापि, बोनस शेअरच्या बाबतीत, बोनस समभाग हे विद्यमान भागधारकांना प्रदान केलेले अतिरिक्त शेअर्स आहेत . यामुळे, त्याचा पोर्टफोलिओच्या एकूण मूल्यांकनावर सकारात्मक परिणाम होतो.
स्टॉक स्प्लिटचा परिणाम सर्व नवीन आणि विद्यमान शेअरधारकांवर होतो, तर बोनस शेअर्स फक्त विद्यमान भागधारकांवर परिणाम करतात.
बोनस शेअर्स मध्ये शेअरच्या face value काहीच बदल होत नाही तर शेअर स्प्लिट केल्याने शेअरच्या face value सुद्धा स्प्लिट प्रमाणात बदलत असतात.
स्टॉक स्प्लिट चे फायदे
शेअरची किंमत कमी होते
जसे आपण पहिले कि शेअर स्प्लिट केल्यावर शेअरची संख्या वाढते पण शेअरची किंमत कमी होते. त्यामुळे जे नवीन ग्राहक असतात ज्या व्यक्तींना तो शेअर खरेदी करायचं असेल तर ते कमी किंमतीमुळे खरेदी करू शकतात .ज्याचा फायदा कंपनीला होतो. शेअरची किंमत कमी झाल्याने आधीचे गुंतवणूकदार जास्त गुंतवणूक करण्यास तयार होतात .
Liquidity वाढते
कंपनीच्या एकूण शेअर्स वाढल्याने कंपनीची Liquidity वाढते .
गुंतवणूकदारांना आकर्षित करते
वर नमूद केल्याप्रमाणे, शेअरची किंमत कमी झाल्यामुळे आणि गुंतवणूकीत अडथळा कमी झाल्यामुळे अनेकदा समभागांचे विभाजन गुंतवणूकदारांना आकर्षित करते.
भविष्यात जास्त शेअरवर डिविडेंड मिळू शकतो, अर्थातच शेअरची संख्या आपल्याकडे वाढल्याने भविष्यात जर त्या कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला तर आपल्याला अधिक शेअरवर डिव्हिडंड मिळेल.
No comments:
Post a Comment