Sunday, 17 October 2021

Option trading बद्दल गैरसमज

Option trading बद्दल गैरसमज
मार्जीन ट्रेडिंग म्हणजे काय?

मार्जीन ट्रेडिंग हा शेअर बाजारात खुप महत्त्वाचा घटक आहे. 

शेअर बाजारात गुंतवणूक केलेल्या मुळ रक्कमेवर कर्जाउ रक्कमेने काही काळासाठी शेअर बाजारात व्यवहार करणे याला मार्जीन ट्रेडिंग असे म्हणतात. 

मार्जीन ट्रेडिंग चे फायदे व तोटे

फायदे :- 

१)कमी काळासाठी गुंतवणूकीसाठी रक्कम तातडीने सवलत उपलब्धता. 

२)कमी काळासाठी गुंतवणूकीसाठी अंदाज जर योग्य असला तर कमी गुंतवणूक करुन जास्त फायदा मिळवता येतो. 

३) या कर्जाउ रक्कमेसाठी कोणतीही कागदपत्रे ची गरज न भासता आपल्यातच ट्रेडिंग अकाउंट मध्येच ती रक्कम मुळत: तरतुद केलेली असणे. 

४)काही ब्रोकर कर्ज मुळ रक्कमेच्या ४,५,१०,२० पट ही कर्जाउ रक्कम देतात. (जेवढे जास्त पट कर्ज तेवढा धोका जास्त व फायदाही जास्त)

तोटे:-

१)कर्जाउ रक्कमेने केलेला व्यवहार हा ठराविक काळासाठी दिलेला असतो म्हणून त्या काळात जर फायदा न झाल्यास नुकसान सहन करावे लागते. 

२)कर्जाउ रक्कमेवर केलेला व्यवहाराची वेळोवेळी पडताळणी न करता केल्यास हळु हळु आपली मुळ रक्कमेचे नुकसान करत करत मुळ रक्कम कधी संपते ही कळतही नाही. 

३)कर्जाउ रक्कमेवर कायम फायदा होणारी लोक अजुनही कधी पाहीले नाही कारण आजवर शेअर बाजारात नुकसान होणारी माणसे ही जादातर मार्जीन ट्रेडिंग करणारीच असतात. 

4)शेअर बाजार ही जणु एक विहीर आहे इकडे लोक पाणी(पैसे)प्यायला येतात पण लालसे व हावरटपणा पोटी कर्जाउ रक्कमेने व्यवहार करुन या विहीरीत उडी टाकण्याची वेळ येण्याची वाट पाहेपर्यंत व्यवहार करतात म्हणून या तोट्यापासुन सावध राहाण्यासाठी मार्जीन ट्रेडिंग न वापरणे हेच योग्य. 

५)मार्जीन ट्रेडिंग च्या जोरावर बरेचश्या जाहीरात कंपनी *दिवसा ५००० ते १००००कमवा*  अशा जाहीराताच्या लोभी पणाला लोक बळी पडतात, म्हणून त्या पासुन सावधान. 

*मुळ रक्कम जेवढी आहे तेवढीच गुंतवणे हाच त्यावर योग्य व सावधानतेचा उपाय आहे.* *(हंतरुण पाहुन पाय पसरावे)*

विहीरीत पाणी प्या पण आपल्या भांड्यात मावेल तेवढेच प्या नाहीतर विहीरीत उडी टाकुन जीव द्यावा लागेल

शेअर बाजार एका विहीरी सारखा आहे यात पाणी प्यावे नेहमी का उडी टाकुन जीव द्यावा हे आपण ठरवावे

                     *Option trading* बद्दल आपल्या    शेअर बाजार मध्ये फार चुकीचे समज सर्व  सामान्यानमध्ये आहेत की option मध्ये जँकपाँट tips असते, आणि अशी tips निघाली की काम फत्ते झाले समजा. पण अशी tips असते का? तर खरे उत्तर येईल की नाही. त्याचीही काही कारणे आहेत, ती खालील प्रमाणे......................

1) option चा भाव वाढण्याचे कारण एकच आहे.

     कधीही ( call कींवा put ) चे प्रिमियम लवकर वाढते जर तो कमी वेळात आपले अंतर  कापुन लवकर पुढे जातो तेव्हाच त्यात जोमाने वाढ होते.

2) option चे प्रिमियम (call कींवा put) न वाढण्याची कारणे बरीच आहेत. ती खालील प्रमाणे.

     Option मध्ये रोज 2% प्रिमियम घटते जरी तो एक्सपायरी पर्यन्त त्याच जागेवर राहीला तरीही 

उदा. आज जर 100 रु चा call कींवा put आहे तर तो एक्सपायरी पर्यन्त 20 दिवस बाकी आहेत तर आजची त्या call कींवा put ची कींमत ही प्रत्येक दिवस 2% या कीमंतीला वजा केले तर आजची कींमत 40% वजा करुन 60 रु अशी आहे .

option हा call कींवा put विरुद्ध दिशेने गेला तरीही पडतो.

घेतलेला call कींवा put एक्सपायरी पर्यन्त त्याच स्ट्राईक प्राईज वर बंद झाला तरीही तो 0 होतो .

वरील तीन कारणास्तव option वाढत नाही म्हणुन मोठा ट्रेडर हा नेहमी option मोठ्या प्रमाणात विकुन त्याचा विक्रीवर जोर ठेवुनच असतो त्यामुळे option वाढण्यास ताकत मिळत नाही व तो option शेवटी एक्सपायरीला 0 होतोच.

         तरी वरील कारणान मुळे option खरेदी करणारा जादातर कमवुन सुद्धा एकदाच मोठ्या प्रमाणात नुकसान झेलतो.

महत्वाचे:- एक्सपायरी जँकपाँट च्या भानगडीत कधी पडु नका कारण एक सालात 12 एक्सपायरीत 5 एक्सपायरी कमवालही पण बाकी 7 एक्सपायरी गुंतवलेले प्रिमियम 0 होण्याची दाट शक्यता असते.


          मित्रांनो एक पोते पेरले तर चार पोती पीक येते पण चारशे पोतींचा जँकपाँट ची वाट पाहाणे चुकीचे आहे.

No comments:

Post a Comment