IPO (Initial Public Offering) म्हणजे काय?
एक खाजगी कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा आपले भाग (shares) विक्रीस काढते त्यावेळी त्यास IPO असे संबोधले जाते. अशा खाजगी कंपन्या ज्या शेअर बाजारात नोंदणीकृत नाहीत, त्यांना थेट भाग (shares) विक्री करता येत नाहीत. यासाठी IPO जाहीर केला जातो. IPO मार्फत खाजगी कंपनीची शेअर बाजारात नोंद होते आणि भाग विक्री प्रारंभ होते. खाजगी कंपनी शेअर बाजारात नोंद करते, तेव्हा ती सार्वजनिक कंपनी होते.जेव्हा एखादा व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात, तेव्हा अनेक बदल केले जातात.जसे कर्मचारी, जागा, सुविधा आणि इतर. अप्रत्यक्षपणे व्यवसाय वृद्धीसाठी भांडवल/पैसे आवश्यक असतात. उत्पन्न वाढवायचे असेल तर भांडवल वाढवावे लागेल, भांडवल वाढवण्यासाठी शेअर बाजार नोंदणी केली जाते, जेणेकरून आपले भाग (shares) विक्री करता येतील. इथून भांडवल मिळते आणि ते व्यवसाय वाढीसाठी गुंतवले जाते.
व्यवसाय/कंपनी लहान माध्यम स्वरूपात असेल तर त्यात फार कमी लोक गुंतवणूक करतात आणि त्याच प्रमाणे उत्पन्न मिळते. मात्र ज्यावेळेस या व्यवसायाची शेअर बाजारात नोंदणी केली जाते त्यावेळेस सामान्य लोक देखील या व्यवसायात भागीदारी घेऊ शकतात. भाग विकत घेऊन कोणीही गुंतवणूक करू शकतो. यात व्यवसाय आणि गुंतवणूकदार या दोघांचा फायदा होतो.भांडवल वाढवण्यासाठी बँक कर्जाचा पर्याय देखील आहे. कर्ज घेतले तर त्यावर असणाऱ्या व्याजदराप्रमाणे पैसे परत द्यावे लागतात. या मध्ये व्यवसायाचे उत्पन्न झाले अथवा नाही याची परिणाम परतफेडीवर होत नाही. जर नुकसान झाले तरीही व्याजदर प्रमाणे परतफेड करावीच लागेल. याउलट शेअर बाजारात नफा/तोटा या प्रमाणे गुंतवणूक आणि परतफेड केली जाते.
No comments:
Post a Comment