Sunday 17 October 2021

कॉल ऑप्शन म्हणजे काय?

कॉल ऑप्शन म्हणजे काय?
कॉल ऑप्शन call option जर आपण खरेदी केले आणि स्टॉक जर वर गेला तर आपणाला प्रॉफिट होतो आणि जर स्टॉक जास्त वाढला नाही किंवा पडला, आणि महिन्याअखेरीस जर आपण तो काढला नसेल तर आपणाला नुकसान होण्याची शक्यता असते.
कॉल ऑप्शन जर आपण विकला आणि जर स्टॉक खाली गेला किंवा विशेष नाही वाढला तर आपणाला प्रॉफिट होऊ शकतो. पण जर तो उलट फिरला आणि तो चांगलाच वर गेला तर आपणाला खूप नुकसान होऊ शकते, त्यामुळे ऑप्शन विकणाऱ्यांनी शक्यतो स्टॉप लॉस stop loss लावून ठेवावा, जेणेकरून जर एखाद्या बातमीच्या परिणामामुळे उलट फिरलाच तर होणारे नुकसान टाळता येऊ शकते.
पूट ऑप्शन म्हणजे काय
पूट ऑप्शन put option जर आपण खरेदी केले आणि स्टॉक जर पडला तर आपणाला प्रॉफिट होतो आणि जर स्टॉक जास्त पडला नाही किंवा वाढला, आणि महिन्याअखेरीस जर आपण तो काढला नसेल तर आपणाला नुकसान होण्याची शक्यता असते.
पूट ऑप्शन जर आपण विकला आणि जर स्टॉक वर गेला किंवा विशेष नाही पडला तर आपणाला प्रॉफिट होऊ शकतो. पण जर तो उलट फिरला आणि तो चांगलाच खाली गेला तर आपणाला खूप नुकसान होऊ शकते, त्यामुळे पूट ऑप्शन विकणाऱ्यांनी सुद्धा शक्यतो स्टॉप लॉस stop loss लावून ठेवावा.

No comments:

Post a Comment