Sunday, 17 October 2021

इनव्हेस्टर & ट्रेडर

शेअर मार्केट मध्ये दोन प्रकारचे लोकं असतात -

1) इनव्हेस्टर 

2) ट्रेडर. 


1) इनव्हेस्टर म्हणजे सहसा दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणारे व फंडामेंटल बेसिसवर गुंतवणूक करणारे. फंडामेंटल बेसिस याचा अर्थ ज्या कंपनीचे शेअर खरेदी करायचे आहेत त्या कंपनीचा व्यवसाय कसा आहे, तिची बॅलन्सशीट कशी आहे इत्यादी कंपनीसंबंधित मूलभूत बाबी तपासून मग गुंतवणूक करणारे.


2) उलट ट्रेडर म्हणजे शेअरचा भाव किती आहे, टेक्निकल चार्टप्रमाणे तो खाली जाईल की वर, अशा गोष्टी बघून त्या आधारे गुंतवणूक करणारे व वेळ साधून लगेच घेतलेले शेअर विकून नफा खिशात घालण्याचा प्रयत्न करणारे. यांची त्या शेअरमधील गुंतवणूक दीर्घकाळासाठी नसते.

ट्रेडरमध्येही काही उपप्रकार आहेत-


इंट्राडे म्हणजे आज घेतलेले शेअर्स आजच विकून टाकणारे. सकाळी 9.15 ला शेअर मार्केट सुरू होते ते दुपारी 3:30 पर्यंत सुरू असते. यादरम्यान केव्हाही शेअर्स घेऊन केव्हाही ते विकता येतात. इंट्राडे ट्रेडर मार्केट बंद होण्याच्या आत वेळ साधून ते विकून टाकतात. ट्रेडरचे सर्वसाधारणपणे इतर प्रकार आहेत.

स्विंग ट्रेडर म्हणजे जास्तीत जास्त साधारण एक आठवडा ते शेअर्स ठेवतात.

मोमेंटम ट्रेडर म्हणजे तो जास्तीत जास्त एक महिना शेअर्स ठेवेल. 

पोझिशनल ट्रेडर म्हणजे तो जास्तीत जास्त तीन महिने शेअर्स ठेवेल इत्यादी. 

अर्थात, स्विंग ट्रेडिंग म्हणून शेअर्स खरेदी केले व नंतर ती पोझिशन काही महिने कॅरी केली असे होऊ शकते. त्यावर निर्बंध नाही. तसेच इंट्राडेच्या उद्देशाने शेअर्स खरेदी केले व काही दिवस ठेवले असेही होऊ शकते. मार्केट बंद होण्याच्या आधी मात्र ट्रेड तसा बदलवावा लागेल.

No comments:

Post a Comment

Seo Tutorial In Marathi Full Guide for beginners 2022

Seo Tutorial in Marathi : कोणत्याही Website किंवा blog वर traffic आणण्याचे अनेक मार्ग आहेत त्यातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग म्हणजे SEO. S...