Thursday, 15 October 2020

महर्षी वाल्मीकी यांचा परिचय, महर्षी वाल्मीकी जयंती |Maharshi Valmiki Biography in मराठी

 


महर्षी वाल्मीकी यांचा परिचय (चरीत्र), कोण होते, 2020 जयंती, जन्म, आश्रम, रामायण, महत्व भजन (Maharishi Valmiki, Ramayan, Birth, Place, Biography in Marathi)

आपल्याला माहिती आहे का? महाकवी वाल्मीकी हे एक पुर्वाश्रमीचे डाकु होते. वाल्मीकी जयंती अर्थात एक असा दिवस ज्या दिवशी महान रचनाकार वाल्मीकीजी यांचा जन्म झाला. यांच्या महान रचनांमध्ये आपल्याला महान ग्रंथ रामायणाचे सुख मिळाले. हा एक असा ग्रंथ आहे. ज्यामध्ये मर्यादा, सत्य, प्रेम, भातृत्व (बंधुभाव), मित्रत्व, आणि सेवकाचे धर्म यांची खरी व्याख्या शिकवीली.

          महर्षी वाल्मीकी यांच्या जिवनातून आपल्याला खुप काही शिकायला मिळते, त्यांचे व्यक्तीमत्व साधारण नव्हते. त्यांनी आपल्या जिवनातील एक घटतेतुन प्रेरणा घेत आपला जिवनमार्ग बदलुन टाकला. ज्याचे फळ म्हणून ते पुज्यनिय असे महाकवी ठरले. हीच घटना त्यांच्या चरित्राला महान बनवते आणि अपल्याला त्यांच्याकडून शिकण्यासाठी प्रोत्साहीत करते.

 


महर्षी वाल्मीकी यांचा परिचय (Introduction) u

नाव

महर्षी वाल्मीकी

वास्तविक नाम

रत्नाकर

पिता

प्रचेता

जन्म दिवस

आश्विन पूर्णिमा

पेशा

डाकू, महाकवि

साहित्य

रामायण

वाल्मीकि यांच्या जिवनातील प्रेरणादायक घटना (Story) -

महर्षी वाल्मीकी यांचे मुळ नाव रत्नाकर होते आणि त्यांचे पालन पोषण जंगलातील भिल्ल(वाल्मीकी) जमातीत झाले होते, त्यामुळे त्यांनी भिल्लांच्या परंपरेचा स्विकार केला होता आणि आपली उपजिवीका भागविण्यासाठी ते डाकू झाले होते. आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्यासाठी ते वाटसरुंना लुटमार करत होते, गरज पडली तर ते त्यांना मारुनही टाकत असे. अशा प्रकारे ते प्रतिदिवस आपल्या पापांचा घडा भरत होते. 

एक दिवस त्यांच्या जंगलातून नारद मुनी जात होते. त्यांनी पाहिले की डाकू रत्नाकरने त्यांना आडरस्त्यावर गाठले आहे. त्यांनी डाकु रत्नाकरला प्रश्न विचारला की, तु असे पाप का करत आहेस? डाकू रत्नाकर ने उत्तर दिले की आपले आणि आपल्या परिवाराचे भरण पोषण करण्याकरिता. तेव्हा नारदमुनींनी विचारले की, ज्या परिवारासाठी तु हे पाप करत आहेस. तो परिवार तुझ्या पापांचे फळ भोगण्यात वाटेकरी होणार आहे का? त्यावर डाकू रत्नाकरने उत्साहाने उत्तर दिले, हो नक्कीच माझा परिवार त्यावेळीही माझ्यासोबतच राहील.  नारद मुनि म्हणाले एकदा त्यांना विचारुन तर पहा, जर ते हो म्हणाले तर मी माझे सर्व धन तुला द्यायला तयार आहे. रत्नाकरने कुटुंबातील सर्व सदस्यांना आणि मित्र परिवाराला विचारणा केली मात्र कुणीही पापाचा वाटेकरी होण्यासाठी तयार झाले नाही. या वस्तुस्थितीचा डाकू रत्नाकरच्या मनावर खोलवर आघात झाला आणि आपला लुटमारीचा मार्ग सोडून तो तपमार्गाकडे वळला. त्याने बरेच वर्ष ध्यान आणि तप केले. ज्याचे फळ म्हणुन त्यांना महर्षि वाल्मीकी नाव आणि दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली आणि त्यांनी संस्कृत भाषेतील रामायण या महाण ग्रंथाची रचना केली.  

अशा प्रकारे डाकू रत्नाकरच्या जिवनातील एका घटनेमुळे ते एक महान रचनाकार महर्षि वाल्मीकी झाले.

कोण होते महर्षि वाल्मीकि (Who is Maharshi Valmiki )  

वाल्मीकी आपल्या पुर्व आयुष्यात एक डाकू होते. आणि त्यांचे पालन पोषण भिल्ल जनजातीत झाले होते.  काही ग्रंथांनुसार ते भिल्ल म्हणुन वावरत असले तरी ते मुळ भिल्ल जातीचे नव्हते, महर्षि वाल्मिकी हे प्रचेताचे पुत्र होते. पुराणांमध्ये प्रचेताजींचा परिचय ब्रम्हाजींचा पुत्र असा दिला आहे. लहाणपणी त्यांना एका भिलनीने चोरुन नेले आणि त्यामुळे त्यांचे पालण पोषण भिल्ल जमातीत होऊन ते पुढे डाकू झाले, अशीही एक अख्यायीका आहे.

  1. त्यांना रामायण लिहण्याची प्रेरणा कशी मिळाली ?

जेव्हा डाकु रत्नाकरला आपल्या पापांचा आभास झाला, तेव्हा त्यांनी आपल्या अशा जिवनमार्गाचा त्याग केला आणि नवीन मार्गाचा अवलंब केला. आपल्या या नवीन मार्गाविषयी त्यांना कोणतीही माहिती नव्हती, आपली ही शंका नारद मुनींना सांगीतल्यावर मुनींनी त्यांना फक्त राम नामाचा जप करण्याचा सल्ला दिला. डाकू रत्नाकरने खुप दिवसांपर्यंत राम नामाचा जप केला. परंतू विशेष ज्ञान नसल्याने राम राम ऐवजी मरा मरा असा बदल त्यांच्या जपामध्ये झाला. त्यामुळे त्यांचे शरीर दुर्बल झाले आणि त्यांच्या शरीराला मुंग्या लागल्या. कदाचीत हा त्यांच्या पुर्वकर्माचा भोग असावा. यामुळेच त्यांचे नाव वाल्मीकी असे पडले. त्यांच्या साधनेची कठोरता पाहून त्यांच्यावर ब्रम्हदेव प्रसन्न झाले, आणि त्यांनी रत्नाकरला दिव्य ज्ञान दिले. या ज्ञानामुळेच त्यांच्यात रामायण घडण्यापुर्वी ते जाणून घेण्याचे आणि ते श्लोकबध्द करण्याचे कार्य त्यांना करता आले.  

  1. महर्षि वाल्मिकीनी पहिल्या श्लोकाची रचना कशी केली?

एकदा महर्षी तप करण्यासाठी गंगा नदीच्या तीरावर गेले होते. तेथेच जवळ पक्षांचा जोडा प्रेमरत होता. त्याच वेळी एका शिकाऱ्याने नर पक्षाला बाण मारून त्याची हत्या केली. तेव्हा एक श्लोक आपोआप वाल्मीकींच्या मुखातून बाहेर पडला तो असा :


मां निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।
यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥


अर्थात : ज्या दृष्टाने हे घृनास्पद काम केले आहे. त्याला जिवनात कधीच सुख मिळणार नाही. त्या दृष्टाने प्रेमरत असलेल्या पक्षाचा वध केला आहे.

हा श्लोक ब्रम्हाजींच्या प्ररणेने उत्पन्न झाला असुन अशाच प्रकारे त्यांनी रामायणाची निर्मीती करावी अशी प्रेरणा ब्रंम्हाजींनी वाल्मीकींना दिली. यानंतर दिव्य ज्ञानाच्या आधारे महाकवींनी याच श्लोकाच्या छंदात रामायणाची रचणा केली.

वाल्मिकी रामायण संक्षित्प माहिती (Ramayan History)  

महाकवी वाल्मीकिंनी संस्कृतमध्ये महाकाव्य रामायणाची रचना केली. ज्याची प्रेरणा त्यांना स्वत: ब्रम्हाजींनी दिली होती. रामायणामध्ये भगवान श्रीविष्णुचे अवतार श्री. रामचन्द्रांच्या चरित्राचे सविस्तर वर्णण केलेले आहे. यामध्ये 23 हजार श्लोक लिहीले गेलेले आहेत. त्यातील काही भागात महर्षि वाल्मीकींच्या जिवनाचेही विवरण आलेले आहे. 

महर्षि वाल्मीकिंनी रामाचे चरित्र लिहिले तसेच त्यांनी सिता मातेला त्यांच्या द्वितीय वनवासात आपल्या आश्रमात स्थान देऊन रक्षण केले आणि त्यांचे पुत्र लव कुश यांना उपदेश केला.

वाल्मीकि जयंती केव्हा साजरी केली जाते (Valmiki Jayanti 2020)  

महर्षी वाल्मीकींचा  जन्म आश्विन महिण्याच्या पोर्णिमेला झालेला आहे. आश्विन पोर्णिमेला वाल्मीकी जयंती असे संबोधले जाते. त्यांच्या जन्मवर्षाविषयी कोणतेही ज्ञान नाही. पौराणिक कथांच्या आधारे त्यांचा जन्म रामायण काळाला समांतर माणला जातो.

वाल्मीकी जयंतीचे महत्व (Mahatv)  

वाल्मीकीजींना आदिकवी म्हणतात. अशी मान्यता आहे की, त्यांनीच संस्कृतमधला पहिला श्लोक लिहीला आहे. वाल्मिकी जयंतीला वाल्मीकी प्रकटदिन म्हणूनही संबोधतात.

वाल्मीकी जयंता कशी साजरी केली जाते (Celebration)  

भारत देशात  वाल्मीकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. खास करुन उत्तर भारतात या सनाचे विशेष महत्व आहे.

  1. अनेक प्रकारांच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
  2. शोभा यात्रा काढली जाते.
  3. मिष्ठान, फल, पकवान वितरित केले जातात.
  4. अनेक ठिकाणी भंडाऱ्याचे आयोजन केले जाते.
  5. वाल्मीकी रामायण आणि त्यांच्या चरित्राचे वाचन केले जाते जणे करुन त्यापासून प्रेरणा घेऊन मनुष्याने वाईट कर्म सोडून सत्कर्माचा मार्ग अवलंबावा.
  6. महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात तथा सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन वाल्मीकी जयंती साजरी केली जाते.

वाल्मीकी जयंतीचे हिंदू धर्मात विशेष महत्व असले तरी सर्वांनाच त्यांच्या चरित्रातुन सत्कर्माची शिकवण मिळते.

No comments:

Post a Comment